अहिल्यानगर

गांधी जयंतीदिनी शिक्षण अधिकाऱ्यांची प्राथमिक शाळेस भेट

संगमनेर | बाळासाहेब भोर : ऐतिहासिक व नैसर्गिक वैभव पाहण्यासाठी व त्याची माहिती घेण्यासाठी तालुक्यातील मौजे पेमगिरीत आलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील स्थापना असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून या शैक्षणिक विभागातील अधिकाऱ्यांनी शाळेस भेट दिली.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विविध शैक्षणिक उपक्रम, शैक्षणिक कामकाज यावर चर्चा झाली. शाळेचे कामकाज व गुणवत्ता याबाबत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षणाधिकारी श्री. पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री. पावसे, श्री. खताळ, शाळेच्या मुख्याध्यापिका कढणे मॅडम, मुळे मॅडम, पवार मॅडम, तेलोरे मॅडम, वाकचौरे सर, गंभीरे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button