अहमदनगर

जेष्ठ नागरिकांनी घेतला पंढरपूर सहलीचा आनंद

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील जेष्ठ नागरिक आनंद मेळावा यांनी अधिक मासाचे औचित्य साधुन पंढरपुर येथील सहलीत 51 जेष्ठ नागरिक बंधु व भगिनी यांनी भक्तिरसाचा आंनद लुटला. सहल भल्या पहाटे आरामदायक बसने निघाली. 300 कि.मी. प्रवासात ज्येष्ठांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

जेष्ठानी आपले वय विसरून या प्रवासात धमाल केली. कानडा विठठल, देहाची तिजोरी, सुंदरते ध्यान… ह्या अभंगापासुन तर ओ मेरी जोहराजीबी तुमे मालुम नही तुम अबतक है जवान… तुम अगर साथ देनेका वादा करो, मै युही मस्त नगमे लुटता रहू असा सिनेगीताचा नजराणा पेश करून सगळ्या ज्येष्ठांना आपल्या भूतकाळाची आठवण करून देण्याचे काम राम बोबडे, सौ पवार ताई, प्रा. शंकरराव अनारसे, सौ सारंगधर नानी, लक्ष्मण निकम, पुष्पा जाधव, सौ निकम ताई या जेष्ठांनी मोठी रंगत आणली आणि 300 किमी प्रवास कधी सुरू झाला न कधी संपला हे कळालेच नाही.

संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम, दामोदर जानराव, प्रभाकर भोंगळे, प्रा सुभाष लिंगायत, बाबा दिघे, श्रीराम बोबडे, विजय पवार, साहेबराव कपिले यांनी उत्कृष्ट नियोजन केले. सि. रिटा, सि रिझा, साहित्यिक लेवीन भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सहलीत प्रवासाच्या दरम्यान चहा न्याहरी भोजन तसेच वैद्यकिय सेवा सांऊड सिस्टीमसाठी डाॅ बाबुराव धस, लता गुडधे, सुखदेव सुकळे, दौंडचे सामाजिक कार्यकर्ते मुन्नाभाई सय्यद, पत्रकार कृष्णा निकम, महालक्ष्मी होटेलचे मालक संभाजी किनगरे, रेणुका ट्रॅव्हल्सचे सुनील चव्हाण यांनी सर्वांना अतिशय मोलाचे सहकार्य केले. त्याचा जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तसेच जेष्ठ नागरिक संघटनेच्या लता गुडधे यांचा वाढदिवस साजरा केला. या सहलीत 30 भगिनी व 21 जेष्ठ नागरिक बंधु सहभागी झाले होते. रविवार, दि 20 ऑगस्ट दुपारी 4:00 वा. या महिन्याची सभा विरंगुळा केंद्रात होणार आहे. या सभेत ऑगस्ट महिन्यात ज्येष्ठांचे वाढदिवस व सहलीचा जमाखर्चाचे हिशोब देण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष लक्ष्मणराव निकम यांनी देत सर्व जेष्ठ नागरिक सभासदांनी उपस्थित राहावे, असे आहवान केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button