स्वराज्य संघटनेच्या प्रमुखपदी इंजि. कानवडे
संगमनेर शहर : तालुक्यातील सामान्य कुटुंबातील स्वतःच्या कर्तृत्वावर स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करत कानवडे यांनी ठसा उमटवला आहे. या सर्व गोष्टींची दखल घेत पश्चिम भागातील युवक नेते इंजि. आशिष कानवडे यांची स्वराज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र प्रदेश संपर्क प्रमुख तथा प्रवक्ते करण गायकर यांनी नुकतेच संगमनेर येथे पाहुणचार लॉन्स येथे पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात दिले आहे.
स्वराज्य संघटनेत कार्यकर्ता म्हणुन इंजि. कानवडे यांनी समाधानकारक कार्य केले, तसेच प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेऊन संघटन बांधणीची माहिती घेतलेली आहे, त्यामुळे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या आदेशावरुन उत्तर नगर जिल्हा प्रमुख पदी इंजि.आशिष कानवडे यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातुन स्वागत होत आहे.