भागवत कथा वाचन श्रवण, चिंतनाने आत्मसुखाची प्राप्ती होते- ह.भ.प. दादासाहेब रंजाळे महाराज
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीमद भागवत कथा ऐकणे, वाचणे, चिंतन करणे आणि या महान ग्रंथांच्या सहवासात राहणे ही आत्मसुखाची प्राप्ती देणारी प्रचिती आहे. माणूस सुखाच्या शोधात फिरतो, तो अनेक ताणतणावात जगतो, दुःखातून मुक्ती फक्त भागवत ग्रंथ देतो, असे विचार ह.भ.प दादासाहेब रंजाळे महाराज यांना व्यक्त केले.
श्रीरामपूर शिरसगाव परिसरातील इंदिरानगर येथील श्रीदत्त मंदिरामध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि गुरुचरित्र पारायण सोहळ्यात ते बोलत होते. प्रारंभी संयोजक बाबासाहेब यादव, सौ.लताताई यादव, हेड कॉन्स्टबल सौ. ज्योतीताई तोडमल, जयंतराव तोडमल, पत्रकार ॲड. बाळासाहेब तनपुरे आणि महिला भक्त मंडळाने संतपूजन केले. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वलिखित’ दिव्यत्वाचे चिंतन व साहित्याचे चिंतन ही पुस्तके देऊन रंजाळे महाराजांचा सन्मान केला. पहिल्या दिवशी ग्रंथ शोभायात्रा, श्रीभागवत प्रतिष्ठापना, मुनिजिज्ञासा, परिक्षित चरित्र या भागाचे संगीतमय विवेचन केले. साथीला पेटीवादक प्रसाद महाराज तऱ्हाळ, वादक डॉ. किरण डहाळे उपस्थित होते. सकाळी ९ ते १२ या वेळेत श्रीगुरुचरित्र पारायण झाले. प्रथम स्कंधातील कथा प्रभावी आहे. जेथे स्त्रियांची आणि गाईंची पूजा होते, रक्षण होते, तेथे श्रीकृष्ण जन्म घेतो.
गुरूचरित्र पारायणात लताताई यादव, शकुंतला थोरात, सविता मुतडक, कुसुम साळुंके, रमेश शिंदे, कौशिक कोते, रत्नमाला क्षीरसागर, सुनीता बखळे, छाया धनवटे, रंजना मैड, गीताबाई चव्हाण, सीमा केदार, मनीषा शेलार, सविता तोडमल, साईली दिवसे, ज्योत्स्ना राऊत, हर्षदा काकडे, कल्पना पवार, उषा मुसमाडे, शालिनी बनकर, अरुणा महापुरे, कविता हापसे,मीना आदिक,अर्चना राऊत, सविता गमे, प्रिया गवारे, उषा माळी, प्रतिभा भोर, शालिनी निघुते, अरुणा अहिरे, कविता हापसे, सुनीता मोकाटे, प्रमिला वाबळे, रोहिणी गुंड, शकुंतला शेळके, रोहिणी पटारे, उषा पालवे, प्रतिक्षा किंक्राळे यांनी भागवत वाचन केले.
तुळजा भवानी महिला मंडळ, श्रीदत्त कृपा महिला मंडळ, भजनी मंडळ सदस्यांनी यामध्ये भाग घेतला. मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण, देविदास गोरे, रावसाहेब औताडे, अण्णासाहेब निघुते, सोपानराव काकडे, किसनराव निकम, तुकाराम डोळस, भाऊसाहेब पालवे, नाना जायभाये, भीमनाथ कटारे भक्त महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.