हिरडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विद्याताई बनकर यांची बिनविरोध निवड
श्रीगोंदा | सुभाष दरेकर : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या हिरडगाव ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी निवड झाली. मावळते सरपंच दिपाली दरेकर यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला.
ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी निवडणूकीची कारवाई सुरू झाली व सरपंच पदासाठी कै. झुबरराव दरेकर गटाच्या विद्याताई रामदास बनकर यांनी अर्ज दाखल केला. विरोधी गटाकडून अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे अत्यंत चुरशीची समजली जाणारी निवडणूक अखेर बिनविरोध झाली व हिरडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी विद्याताई बनकर यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संपतराव दरेकर, काष्टी सोसायटी माजी मॅनेजर बाळासाहेब दरेकर, भाजपचे नेते मिलिंद दरेकर, युवा नेते संतोष दरेकर, उपसरपंच अमोल दरेकर, ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच सुनिता दरेकर, माजी सरपंच दिपाली दरेकर, मा उपसरपंच चिमाजी दरेकर, हिरडगाव सोसायटी चेअरमन विजय भुजबळ, व्हा. चेअरमन कैलास दरेकर, संचालक नवनाथ गुणवरे, लक्ष्मण दरेकर, नाना दरेकर, मेजर श्रीकांत भुजबळ, अशोक भुजबळ, माजी संचालक पोपट ढवळे, देवराव मोरे, संजय दरेकर यांनी नवनिर्वाचित सरपंच विद्याताई बनकर यांचे अभिनंदन केले.