साहित्य व संस्कृती

“वाचन” हाच जीवनाचा प्रामाणिक सहसोबती होय-कवयित्री संगीता फासाटे

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : माणूस हा संस्कृतीशील, बुद्धिमान आणि विवेकशील प्राणी आहे. त्याने आपल्या अक्षरमूल्यातून वाचन संस्कृती निर्माण केली. स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी “वाचन ” हाच जीवनाचा प्रामाणिक सहसोबती होय, असे विचार वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष संगीता फासाटे यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे दिवाळी पाडवानिमित्त कवितावाचन आणि पुस्तकवाचन उपक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी संगीता फासाटे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानच्या सचिव सौ. मंदाकिनी उपाध्ये होत्या. प्रारंभी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी दिवाळी, पाडवा, भाऊबीज इत्यादी सण आणि वाचन संस्कृतीची गरज याविषयी मनोगत व्यक्त केले.’ज्ञानदीप लावू जगी, येईल निर्मळ सुगी” ही कविता सादर केली.
यावेळी कवयित्री विद्या भडके, अनिल धाडगे, गणेश धाडगे, साक्षी धाडगेसह सौ. आरती उपाध्ये, गणेशानंद उपाध्ये उपस्थित होते. डॉ. उपाध्ये आणि सौ. उपाध्ये यांनी वरील उपस्थितांना ग्रन्थभेट देऊन सर्वांचा सन्मान केला. सौ. उपाध्ये यांनी वाचन संस्कृती वाढण्यास सर्वांचे सहकार्य मिळते असे सांगितले, संगीता फासाटे यांनी आपले अनुभव आणि संशोधन याविषयी आपणास प्रतिष्ठानचे वाचनालय हे तात्काळ उपयुक्त ठरते तसेच परिसरातील अनेकांना पुस्तके दिली जातात, पुस्तके देवघेव सहजपणे होते असे सांगितले. त्यामुळे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी असे प्रकल्प गावोगावी राबविले पाहिजे असे सांगून त्यांनी आपल्या “मायजानकी “कवितासंग्रहातील कविता वाचून महत्व सांगितले.
स्व.गोविंदराव आदिकसाहेबांनी दिलेल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून हा कवितासंग्रह अनेकांना वाचनीय ठरला आहे. हाच आदर्श नगराध्यक्ष अनुराधा आदिक, अविनाश आदिक जोपासत असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत त्यावर कविता सादर केली. वाचक, लेखक, अभ्यासक, संशोधक येथील पुस्तके, नियतकालिके, संदर्भसाधनांचा उपयोग करतात असे डॉ. उपाध्ये यांनी सांगून आपल्या कविता सादर केल्या. कवयित्री विद्या भडके यांनी गुरु, आई, भाऊ आणि नाते विषयक कविता सादर केल्या. अनिल धाडगे यांनी पुस्तके, पुरस्कार आणि उपक्रमाचे कौतुक केले.पुस्तके ही दिवाळीची खरी भेट मिळाली असा आनंद व्यक्त केला. सौ.आरतीउपाध्ये यांनी नियोजनात भाग घेतला तर गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button