अहिल्यानगर
जवाहलाल नेहरू विद्यालय पेमगिरी नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न
संगमनेर/बाळासाहेब भोर : स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरी येथे विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेली अनेक वर्षांपासून या इमारतीचा प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने मार्गी लागणार असून दसऱ्याच्या विजयी मुहूर्तावर नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा म्हणजे आजी सोनियाचा दिनु… बरसे अमृताचा घनु… अशीच काहीशी समाधानाची प्रतिक्रिया सर्व विद्यार्थी व नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. गावातील सर्व मंदीरांची कामे पूर्ण झाली. मात्र विद्यामंदिराचेच काम बाकी होतं. तेही मार्गी लागल्याने स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीच्या वैभवात आणखी एका सुसज्य वास्तूची भर पडणार आहे.
या भूमीपूजनाच्या कार्यक्रम प्रसंगी नाशिक विधानपरिषद पदवीधर मतदार संघांचे आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषद सदस्य आर एम कातोरे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, शिर्डी देवस्थानचे विश्वस्त सुहास आहेर, ज्ञानदेव सहाणे, भारत सर्व सेवा संघ पाचेगाव या संस्थेचे अध्यक्ष नलगे सर, मीननाथ शेळके, शरद कोकणे, बाळासाहेब कानवडे, पेमगिरी सरपंच सौ. द्वारका डुबे, इंजि. सोमनाथ गोडसे, रावसाहेब काका डुबे, जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.