अहिल्यानगर
प्रहार जनशक्ती पक्षाच्या राहुरी तालुकाध्यक्ष पदी लांबे
राहुरी प्रतिनिधी : तालुक्यातील पिंप्री अवघड येथील सुरेश उर्फ सुर्यभान दत्तात्रय लांबे यांची नागापुर अहमदनगर येथे मंत्री ना. बच्चुभाऊ कडु यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या राहुरी तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सुरेश लांबे यांनी आजपर्यंत अनेक आंदोलने हाती घेत यशस्वी केले आहे. याची पावती म्हणून आज त्यांच्यावर ना. बच्चुभाऊ कडु यांनी तालुक्याची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे राज्य प्रवक्ते संतोष पवार, अहमदनगर जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, राहुरी तालुका प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष मधुकर घाडगे व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.