अहिल्यानगर
मुळाधरण परिसरात गणेश विसर्जनासाठी पोलीस बंदोबस्त
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : गणेश विसर्जन निमित्त मुळानगर येथील धरणावर जिल्ह्यातील गणेश मंडळ मूर्ती तसेच घरगुती गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी गणेश भक्त येत असतात. परंतु मागील काळात बरेच भक्त पाण्यात बुडाले होते. त्यामूळे पोलीस प्रशासनाच्या वतीने राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई शेख यांच्याशी चर्चा करून विसर्जनासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गावातील काही तरुणांना स्वयंसेवक म्हणून नेमले होते. गावातील मच्छिमार करणारे रमेश गंगे तसेच त्यांचे मुले इंद्रजीत गंगे, आदेश गंगे, विकास गंगे, विजू गंगे, करण सूर्यवंशी यांनी आपल्या होडीतून भाविकांसाठी गणपती विसर्जन करण्यास सहकार्य केले. तसेच मागील महिन्यात 15 ऑगस्ट रोजी जे दोन तरुण बुडाले होते, त्यातील एकास विकास गंगे या तरुणाने वाचविले होते. तसेच आज देखील त्यांनी पोलिस प्रशासनास चांगल्या प्रकारे सहकार्य केले. भाविकांकडून कुठल्या प्रकारची पैसे घेतले नाही. लोक सहखुषीने जे देत होते ते घेतले. बंदोबस्त करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बोकील तसेच जाधव यांच्यासह दोन होमगार्ड होते. ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई शेख हे स्वतः लक्ष देण्यासाठी धरण परिसरात उपस्थित होते. गावातील अन्य तरुण अशपाक पठाण, निलेश पवार, राहुल परदेशी सहकार्य करीत होते.