कृषी

कृषि कन्येने केले माती परिक्षणासह महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीनगर तालुक्यातील शेंडी येथे के.के. वाघ कृषि महाविद्यालय, नाशिक येथील कृषि कन्येचे ग्रामिण जागृकता आणि कृषि औद्योगीक कार्यानुभव कार्यक्रमासाठी स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कृषि कन्या कु. तन्मयी विवेक कानवडे हिने गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक मान्यवरांना भेटून गावाविषयी माहिती मिळवली व गावातील अनेक समस्यांवर चर्चा केली. कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव व त्यासाठी लोकांमध्ये जागृती या विषयी चर्चा करण्यात आली. या कृषि कन्येने 10 आठवड्यांच्या कालावधीत शेतातील माती परिक्षण, फळबाग लागवड, एकात्मीक कीड व रोग व्यवस्थापन, बीजप्रक्रिया, शेतातील अवजारांचा वापर, शेतीचे आर्थिक नियोजन व जनावरांचे लसीकरण इ. बाबत वेळोवेळी प्रात्यक्षिके आयोजीत करुन आधुनिक तंत्रज्ञानाविषयी शेतकर्यांमध्ये जनजागृती निर्माण केली. यावेळी कोव्हीड-19 चे शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करुन हे कार्यक्रम करण्यात आले. 

संबंधीत कृषि कन्येला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. हाडोळे, कार्यक्रम अधिकारी श्रीमती परमेश्वरी पवार, सुनिल बैरागी, शेंडी पोखर्डी येथील प्रगतशील शेतकरी यशवंत दशरत कराळे, सुभाष दशरत कराळे, उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले  कृषि विद्यापीठातील डॉ. भालेकर, डॉ. कुलकर्णी, डॉ. दळवे, डॉ. कडू, प्रा. दिलीप गायकवाड व उपसंशोधन संचालक प्रा. विवेक कानवडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले.

Related Articles

Back to top button