पेन्शनर्स लढा अंतिम टप्प्यात – खा. वाकचौरे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आज शिर्डी येथे ईपीएस पेन्शनरांचा विभागीय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग अण्णा जाधव होते.
यावेळी पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली महासचिव विरेंद्र सिंग राजावत, डॉ. पी.एन.पाटील व टीम ने अथक परिश्रम करून आपला लढा अंतिम टप्प्यात आणलेला असून श्रम मंत्री डॉ.मनसुक मांडविया यांचे समवेत मागील महिन्यात ३ वेळा बैठक करून आपल्या मागण्या मान्य करणेचा आग्रह धरल्याने मंत्री महोदय यांनी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय मंजूर करुन घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे असे आश्वासीत केले आहे. त्यामुळे येत्या २ ते ३ महिन्यात निश्चितच आपला प्रश्न मार्गी लागणार आहे. राष्ट्रीय संघर्ष समितीच्या सर्व टीमने यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत याची जाणीव करून दिली. तसेच महाराष्ट्रातील ज्या खासदारांनी संसदेत व श्रम मंत्री यांची भेट घेऊन विनंती केली त्या सर्वांना धन्यवाद दिले.
प्रमुख अतिथी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले की, मी प्रथमपासूनच आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपले सोबत आहे व यापुढेही कायम सोबत राहील. मी स्वतः श्रम मंत्री यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असता त्यांनी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ईपीएस पेन्शनरांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे मान्य केले आहे. तुमच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा करील असे सांगितले. अध्यक्ष देविसिंग जाधव यांनी संघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी मेळाव्यात नाशिक जिल्हाध्यक्ष अरुण शेजवळ, उपाध्यक्ष कैलास आहेर, महिला आघाडी राज्य उपाध्यक्षा श्रीमती आशाताई शिंदे, धुळे तालुकाध्यक्ष एन.जी.रजपूत, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष वाळके अप्पा, जेष्ठ कार्यकर्ते गोरक्ष कापसे, अकोले तालुका उपाध्यक्ष बबनराव शेटे आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास मोठ्या संख्येने पेन्शनर उपस्थित होते.
मेळावा यशस्वीस्वितेसाठी जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, शिर्डी अध्यक्ष दशरथ पवार, रुई अध्यक्ष सुभाष अरसुळे, संपत शेळके, नेवासा तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट, नगर तालुकाध्यक्ष भिसे, पारनेर अध्यक्ष आयुबभाई शेख, संगमनेर तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, उपाध्यक्ष व्ही.के सोनवणे, माणिक अस्वले, जालिंदर शेलार, सुरेश कटारिया, लक्ष्मण हासे ,भागवत खंडिझोड, रायभान तुपे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.