कृषी

राहुरी कृषि विद्यापीठातर्फे रब्बी पिकाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रब्बी 2023- 24 हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारी, करडई, हरभरा व गहू पिकांचा मूलभूत व प्रमाणित/ सत्यप्रत बिज्योत्पादन कार्यक्रम राबविलेला आहे. रब्बी 2024 -25 हंगामासाठी वरील पिकांचे बियाणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध संशोधन केंद्र, कृषि महाविद्यालय, कृषि तंत्र विद्यालय व कृषि विज्ञान केंद्र या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

शेतकऱ्यांनी त्यांच्या नजीकच्या कृषि विद्यापीठाच्या संशोधन केंद्रावर, कृषि महाविद्यालय, कृषि तंत्र विद्यालय व कृषि विज्ञान केंद्र येथे बियाणेसाठी संपर्क साधावा. राहुरी येथील मध्यवर्ती बियाणे विक्री केंद्रावर व कृषि संशोधन केंद्र, चास, ता. जि. अहमदनगर येथे ज्वारीच्या फुले रेवती, फुले वसुधा, फुले सुचित्रा, फुले यशोमती, फुले मधुर, फुले रुचिरा, करडईच्या फुले भिवरा ( एसएसएफ- 13- 71) विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच हरभऱ्याचे विजय, फुले विश्वराज, दिग्विजय, विशाल, फुले विक्रम, फुले विक्रांत व गव्हाचे फुले समाधान या वाणांचे प्रमाणित /सत्यप्रत बियाणे ऑक्टोबर- 2024 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सोलापूर येथे करडईच्या फुले भवरा (एसएसएफ- १३-७१) या वाणांचे प्रमाणित /सत्यप्रत बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कृषि संशोधन केंद्र, कुंदेवाडी, ता. निफाड या विक्री केंद्रावर हरभऱ्याच्या दिग्विजय, विशाल, फुले विक्रम, फुले विक्रांत व गव्हाच्या फुले समाधान या पिकांच्या वाणाचे प्रमाणित/ सत्यप्रत बियाणे ऑक्टोबर 2024 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

कृषि तंत्र विद्यालय, मांजरी फार्म ता. हवेली, जि. पुणे या विक्री केंद्रावर गव्हाचे फुले समाधान या वाणांचे प्रमाणित/ सत्यप्रत बियाणे ऑक्टोबर 2024 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, जि. सातारा व कृषि विज्ञान केंद्र, धुळे येथील विक्री केंद्रावर गव्हाचे फुले समाधान या वाणाचे प्रमाणित सत्यप्रत बियाणे ऑक्टोबर- 2024 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. नितीन दानवले यांनी शेतकऱ्यांना या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button