अहमदनगर
वृक्षारोपण ही काळाची गरज – पोलीस निरीक्षक दराडे
कोतवाली पोलिस स्टेशन व 'स्नेहबंध'तर्फे वृक्षारोपण
जावेद शेख : आजच्या काळात वृक्षारोपण ही काळाची गरज बनली असून वृक्षारोपण करताना पर्यावरण रक्षणाचा संदेश देत प्रत्येक नागरिकाने एक तरी वृक्ष लागवड करावे, असे आवाहन कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले.
कोतवाली पोलिस स्टेशन व स्नेहबंध सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक दराडे यांनी सामाजिक, जातीय व धार्मिक सलोखा अबाधित राहील यादृष्टीने मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी स्नेहबंध फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उध्दव शिंदे, सहा.पो. निरीक्षक योगिता कोकाटे, माजी प्राचार्य एकनाथ जगताप, पीएसआय प्रविण पाटिल, पो.हे. पांढरकर, पो.हे. काळे, अमोल बास्कर, स्वयंम बास्कर, संजय कुलकर्णी, तसेच इतर अंमलदार उपस्थित होते.