शिक्षणवारी ज्ञान पंढरी
मानोरीत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ठुबे, उपाध्यक्षपदी वाघ
आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील मानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिळेवस्ती येथे पालक मेळाव्यात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राहुल सुभाष ठुबे व उपाध्यक्षपदी शिवाजी वाघ यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी उपसरपंच शिवाजी थोरात, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गणेश ठुबे, जबीन सिकंदर शेख, अनिल ठुबे, सोनाली पोटे, रफिक शेख, गणेश बर्डे, सारिका आढाव, माधुरी थोरात, नीलेश पोटे, अण्णासाहेब ठुबे, सिकंदर शेख, सुवर्णा ठुबे, देवीदास ठुबे,आदी उपस्थित होते. यावेळी नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे सत्कार करून त्याच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सुत्रसंचालन खराडे सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक होडगर सर यांनी मानले.