शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षकच उमेदवार असावा – महेश पाडेकर
निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे शिक्षक भारतीची मागणी
जावेद शेख : शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही येऊ घातली आहे. मागील १० वर्षांपासून राजकीय पक्ष व शिक्षकांची जाण नसलेले उमेदवार विधानपरिषदेत निवडून जातात, परत ६ वर्ष पुन्हा त्या मतदारसंघाकडे बघत देखील नाही. फक्त सत्तेसाठी व राजकीय बळासाठी शिक्षक आमदारकीकडे बघितले जाते. भारतीय संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चांगल्या हेतूने विधान परिषदेतील ह्या जागा त्या त्या घटकातील हुशार व उच्चविद्याविभूषित उमेदवारांसाठी जागा संविधानात ठेवल्या होत्या. जेणेकरून त्याचा शिक्षकांसाठी व शासनास चांगला उपयोग होईल. परंतु, शिक्षक उमेदवार मतदार संघात उभा राहूनही राजकीय शक्ती पुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्यामुळे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षकच उमेदवार असावा अशी अट घालावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर यांनी केली आहे.
शिक्षकांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघत नाही. अनेक अर्ज, संघटनांचे निवेदन देऊनही अधिकारी त्याला दाद देत नाही. २००५ पूर्वी इतर विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली. परंतु, फक्त शिक्षकांनाच जुनी पेन्शन योजना लागू केली नाही. सरसकट जुनी पेन्शन योजना, अशैक्षणिक कामे, शालार्थ आय.डी., वैयक्तिक मान्यता, विनाअनुदान धोरण, विद्यार्थी अट शिथिलता, वरिष्ठ निवड श्रेणी, आदिवासी उपयोजन क्षेत्रातील शिक्षकांच्या समस्या, सावित्री फातिमा कॅशलेस योजना, प्रलंबित वैद्यकीय व थकीत देयके यासारख्या अनेक समस्या या शिक्षकच जाणू शकतो व त्या प्रभावी विधानपरिषदेत मांडू शकतो. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे शिक्षक मतदार संघात फक्त शिक्षक उमेदवार असावा अशी अट घालावी.
या मागणीसाठी शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर, राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष रामराव काळे, कार्याध्यक्ष डॉ. किशोर डोंगरे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, विनाअनुदान धोरण संघर्ष समितीचे महिला राज्याध्यक्ष रूपाली कुरुमकर, उपाध्यक्ष सचिन जासूद, दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाल दराडे, अमोल चंदनशिवे, संजय भालेराव, रूपाली बोरुडे, श्याम जगताप, माफीज इनामदार, मनोहर राठोड, मारुती कुसमुडे, योगेश देशमुख, कल्पना चौधरी, उषा मिसाळ, सुमंत शिंदे, योगेश पाटील, चंद्रशेखर हासे, संपत वाळके, बाबासाहेब चौधरी, गणपत धुमाळ, सुशांत सातपुते, संजय तमनर, चंद्रशेखर हासे, प्रवीण मते, प्रवीण आहेर, सोमनाथ खाडे, जालिंदर पटारे, बाबाजी लाळगे, मीनाक्षी हापसे, बबन भोसले, नानासाहेब खराडे, हरिश्चंद्र पंडित, नितीन शिरसाट आदी पदाधिकार्यांनी पाठिंबा दिला.