शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत शिवजयंती उत्साहात साजरी
राहुरी – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व आयुष्यमान भारत नोंदणी हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आरोग्य शिबिर व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी हा उपक्रम आज या ठिकाणी घेण्यात येत आहे. महापुरुषांच्या जयंती निमित्त समाजाला फायदा होईल असे उपक्रम सर्व शिवभक्तांनी राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन श्री. लांबे पाटील यांनी केले.
आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यातील डॉ. अनिता कुमावत, संदीप कल्हापुरे, जालिंदर वाघमारे, फिरोज देशमुख, मुकुंद दुधाडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिवसेना राहुरी तालुका संघटक महेंद्र उगले, तालुका उपप्रमुख अनिल आढाव, ता. प्र. युवा वैभव तनपुरे, शिवसेना युवा शहर प्रमुख गंगाराम उंडे, तालुका प्रसिध्दी प्रमुख बापुसाहेब काळे, भास्कर सांगळे, महेंद्र शेळके, संदीप कवाने, विजय कोहकडे, नारायण माळी, देवेंद्र जाधव, सतीश घुले, राहुल भोसले आदींसह शिवप्रेमी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.