कला, साहित्य, संस्कृती साठी “स्नेह संयोग” दिनदर्शिका उपयुक्त – खंडू माळवे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : “स्नेह संयोग” दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन साहित्यिक राष्ट्रीय कवी डॉ.खंडू रघुनाथ माळवे यांच्या हस्ते डोंबिवली येथे झाले. सिनेअभिनेत्री जयश्री काळे, व समाजसेवक कवी, पत्रकार शशिकांत सावंत हे यावेळी उपस्थित होते.
भारत सरकारमान्य असलेले साप्ताहिक स्नेह संयोग गेली पंधरा वर्षापासून सातत्याने चालू आहे. समाजसेवेचा ध्यास असलेले कला, साहित्य, संस्कृती, अध्यात्म यांचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने सातत्याने प्रकाशित होत असते. त्याच प्रमाणे स्नेह संयोग वार्षिक दिनदर्शिका ही गेली सात आठ वर्षे प्रकाशित होत आहे.
यामध्ये विविध माहिती सहित आकर्षक आणि कलर फुल ग्लॉसी पेपर वर ची सुबक छपाई व आकर्षक मांडणी आहे, असे राष्ट्रीय कवी खंडू माळवे यांनी आपल्या भाषणात गौरव उदगार काढले. तसेच सौ.जयश्री काळे व पत्रकार शशिकांत सावंत यांनीही संपादक संतोष सावंत यांचे दिनदर्शिकाच्या सुंदर व आकर्षक मांडणी बद्दल तोंड भरून कौतुक केले.
यावेळी संपादक प्रकाशक संतोष सावंत यांनी सर्व जाहिरातदारांचे व सहकारी वर्ग कवी विलास देवळेकर, कवी साहित्यिक विलास खानोलकर, रेवती आळवे यांचेही खास व उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.