कृषी

दूध उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक चारा कापणी व कुट्टी यंत्र गरजेचे- संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार

राहुरी विद्यापीठ : चारा कापणी व कुट्टी यंत्रामुळे मजुरांवरील दैनंदिन खर्चात मोठी बचत होते. दूध उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक चारा कापनी व कुट्टी यंत्र शेतकर्यांनी वापरावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे सहकार्याने गो संशोधन व विकास प्रकल्पाचा दूध उत्पादन खर्च कमी करण्याचे उद्देशाने खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचलीत आधुनिक चारा कापणी व कुट्टी यंत्राचे उद्घाटनप्रसंगी डॉ. सुनील गोरंटीवार बोलत होते. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ, कृषीविद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिलीप देवकर, डॉ. नितीन दानवले व डॉ सुखदेव रणशिंग हे उपस्थित होते.

यावेळी डॉ. श्रीमंत रणपिसे म्हणाले की जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकल्पाच्या बँकिंग क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले. या क्यूआर कोडमुळे ग्राहकांना गांडुळ खत, जीवंत कोंबडी आणि दुध कुपन खरेदी करणे तसेच प्रकल्पाचे सर्व आर्थिक व्यवहार करणे सुलभ होणार आहे.

याप्रसंगी मान्यवरांनी प्रक्षेत्रावर भेट देऊन सोयाबीन (फुले किमया) व ऊस (को 15012) पैदासकार बिजोत्पादन व चारा पिकाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रक्षेत्रावर 750 बांबू वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. उल्हास गायकवाड, डॉ. महेंद्र मोटे, डॉ. रविंद्र निमसे, सुनिल तोडमल, कुणाल पवार व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button