अहिल्यानगर
युवकांचा वंचित बहुजन युवा आघाडीत मोठ्या प्रमाणात प्रवेश
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांचे शिर्डी या ठिकाणी आगमन होताच युवा कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके च्या आतिष बाजीत स्वागत केले. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.
विश्वकर्मा यांनी बोलताना सांगितले की वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर युवकांचे संघटन जोरदार पणे सुरू आहे. सर्व जाती धर्माचे युवा वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये मोठया प्रमाणात सहभागी होत आहेत. युवकांनी स्वाभिमान नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याचे आवाहन केले.
यावेळी युवा महासचिव आप्पासाहेब मकासरे, युवा उपाध्यक्ष योगेश बोरुडे, दिलीप कदम, जिल्हाध्यक्ष विशाल कोलगे, गौतम पगारे, भडांगे निकम, साईनाथ जाधव आदि उपस्थित होते. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट, दक्षिण युवा जिल्हाध्यक्ष संतोष जठार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट यांनी केले.