सामाजिक

अग्निपंख फाऊंडेशनचा २९ वा “आधार” कॅम्प संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील उंदिरगाव येथील सामजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अग्निपंख फाऊंडेशन वतीने नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन आधार कार्ड कॅम्प चे आयोजन केले होते.
सर्व सामान्य नागरिकांना त्यांच्या रोजंदारीमुळे आधार कार्ड मधील त्रुटी दूर करण्यास वेळ मिळत नव्हता. आधार कार्ड दुरुस्ती करिता लांब जावे लागत होते. वेळ जास्त जात होता. त्याचा परिणाम रोजंदारीवर होत होता. त्यामुळे नागरिक आधार कार्ड दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत होते. नागरिकांच्या या गैरसोयीचा अग्निपंख चे अध्यक्ष स्वप्नील पंडित यांनी विचार करून आधार कार्ड दुरुस्ती कॅम्प चे आयोजन केले. नागरिकांचा प्रतिसाद बघता यांनी २९ आधार दुरुस्ती कॅम्प चे आयोजन केले. या मध्ये १२३७ नागरिकांनी लाभ घेतला. अग्निपंख फाऊंडेशन चे वतीने आधार दुरुस्ती बाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. आधार कार्ड दुरुस्ती कॅम्प ला गावातील अनेक मान्यवर यांनी भेट देऊन अग्निपंख फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
सदर आधार कार्ड दुरुस्ती कॅम्प यशस्वी करण्याकरिता राहुल गायकवाड, प्रतीक खडके यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर गाळ्यासाठी अमोल कापिले, इसाकभाई तांबोळी, वसिमभाई शेख, प्रदीप दरंदले, नुरकलाम तांबोळी, जिल्हा परिषद शाळा उंदिरगाव यांनी वेळोवेळी सहकार्य केले. फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी व सदस्य आधार कार्ड कॅम्प यशस्वी करण्याकरिता प्रयत्न करीत आहे. ५० आधार कार्ड दुरुस्ती कॅम्प घेण्याचा त्यांचा मानस आहे.

Related Articles

Back to top button