अहमदनगर

महायज्ञ, देवदेवता जिर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी व्हा- महंत रामगिरी महाराज

लोणी : योगिराज श्री गंगागिरी महाराज १२० वी पुण्यतिथी निमित्त व मंदिर जिर्णोद्धार पुर्वक विविध देवता प्राणप्रतिष्ठा व श्री हरिहर महायज्ञ सोहळ्याचे निमंत्रण सरला बेटाचे मठाधिपती श्री रामगिरीजी महाराज यांनी लोणी खुर्द येथील लोमेश्वर मंदिरात झालेल्या नियोजन बैठकीत भाविकांना दिले. यावेळी बैठकीत बोलताना महंत गुरुवर्य रामगिरी महाराज म्हणाले की, ब्रम्हलिन सद्गुरु गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांनी सन २००९ ला त्यांच्या हयातीत सरला बेट वरचे सर्व मंदिर पाडून जिर्णोद्धार सुरु केले. परंतु दरम्यान च्या काळात नारायणगिरी महाराजांचे महानिर्वाण झाले. त्यानंतर ती जबाबदारी आमच्या वर आली. त्यानंतर ते पूर्णत्वास गेले. आजपर्यत पंधरा कोटी रुपये खर्च झाले असुन ते मंदिर जिर्णोद्धार काम पुर्ण झाले आहे.
सरला बेटावर योगिराज गंगागिरी महाराज यांनी साधना भजन, किर्तन, नामस्मरण केले आहे. बेटावरील सर्व मंदिरे सरला बेटाचे तत्कालीन महंत गुरुवर्य हरीगिरी महाराज यांच्या काळातील होते त्यानंतर नाथगिरी महाराज, सोमेश्वर गिरी महाराज, नारायणगिरी महाराज अशा दोन तीन पिढ्या गेलेल्या असल्याने त्या मंदिराचा जिर्णोद्धार होणे गरजेचे होते. म्हणून नारायण गिरी महाराज यांनी जुने मंदिरे पाडुन नविन मंदिर बांधकाम करुन जिर्णोद्धार केला होता.
त्या निमित्त दिनांक १६ डिसेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान योगिराज सदगुरु श्री गंगागिरी महाराज यांची १२० वी पुण्यतिथी व मंदिर जिर्णोद्धार पुर्वक विविध देवता प्राणप्रतिष्ठा व सामान्य जनतेच्या अडीअडचणी दुर होण्यासाठी, सामान्य माणसाच्या कल्याणार्थ श्री हरिहर महायज्ञ होत असुन त्यात जवळपास विस लाख भाविक सहभाग घेणार आहे. त्यासाठी सर्व भाविकांनी सर्वतोपरीने यथासांग मदत करुन आपन सर्वानी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. यावेळी श्रीकांत मापारी यांनी प्रस्ताविक केले तर सरपंच जनार्दन घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मधु महाराज, आबासाहेब आहेर, राजेंद्र आहेर, श्रीकांत मापारी, आण्णासाहेब कुरकुटे, गणेश दिघे, दिपक घोगरे, विलास घोगरे, शिवाजीराजे आहेर, आनिल जगधने, आमोल जगधने, कृष्णा गागरे, आशोक मोरे, चांगदेव घोगरे, विठ्ठलराव घोगरे, कैलास आहेर, रनजित आहेर, माळकरी मामा, शाहु आहेर, आनिल आहेर, मुन्ना आहेर यांच्यासह भाविक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button