अहिल्यानगर

गोरगरीब जनतेची घरे पाडायला जेसीबी आला तर मी सर्वात पुढे – आ. प्राजक्त तनपुरे; गायरान जमीन अतिक्रमण प्रश्नी राष्ट्रवादीचा जनआक्रोश मोर्चा

बाळकृष्ण भोसले | राहुरी : गोरगरीब जनतेचे घरे पाडायला जेसीबी आला तर सर्वात पूढे मी उभा राहणार. एवढी जनता बेघर होणार असेल तर राज्य कोणासाठी करायचे. गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत असलेल्या कायद्यात तात्काळ बदल करावा. गोर गरीब जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी स्वस्त बसणार नाही. असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपूरे यांनी केले.
गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी राहुरी तहसील कार्यालयावर जनआक्रोश आसूड मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह राहुरी तालुक्यातील गायरान जमीन अतिक्रमणधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी आमदार प्राजक्त तनपूरे बोलत होते.
पुढे बोलताना आ. तनपुरे म्हणाले की, गायरान जमिन अतिक्रमण धारकांचा आवाज सरकार दरबारी पोहोचविण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनात भाषण करताना स्वतःला कायदे पंडित समजतात. त्यामुळे त्यांनी या प्रश्नी तातडीने कायद्यात बदल करायला हवा होता. मात्र जराही तसदी घेतली नाही. गोरगरीब भूमिहीनांनी आता कुठं राहायचं, मंत्रालयात येतो तिथे जागा द्या. असे आ. तनपुरे म्हणाले.
गायरान जमीन अतिक्रमणचा प्रश्न नागपूरला विधानसभा अधिवेशनात प्रभावीपणे मांडणार असून तुम्हाला न्याय दिल्या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गप्प बसणार नाही. जो पर्यंत मी आमदार आहे. तोपर्यंत तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही. असेही आ. तनपुरे म्हणाले. कोणी तरी म्हटल गायरान जमीन अतिक्रमण निघणार नाही. हे सर्व थांबवले आहे. परंतु तुमच्या तोंडी आश्वासनावर आमचा विश्वास नाही. गायरान जमिनी अतिक्रमण बाबत तातडीने कायद्यामध्ये बदल करून अद्यादेश काढा. आम्ही स्वागत करू असे आ. तनपुरे म्हणाले.
आज सकाळी राहुरी बाजार समिती येथून सरकारच्या विरोधात निघालेल्या जनआक्रोश मोर्चात आमदार प्राजक्त तनपुरे, महेश उदावंत, किरण कडू, नंदकुमार तनपुरे, अँड. राहुल शेटे, ओंकार कासार, अण्णासाहेब बाचकर, राजेंद्र बोरकर, उत्तम पवार, अशोक अहिरे, बाळासाहेब खुळे, इंद्रभान पेरणे, राजेंद्र बानकर, आकाश भुजाडी, ज्ञानेश्वर बाचकर, बाळासाहेब लटके, मधुकर पवार, भाऊसाहेब आढाव आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button