अहिल्यानगर
शिरसगाव विद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरसगाव विद्यालयात आज भारताच्या 75 व्या स्वातंत्रदिना निमित्त संस्थेचे सहसचिव ॲड. जयंत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या ध्वजारोहन प्रसंगी मुंबई येथे कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक गोरक्षनाथ बनकर, सरपंच आबासाहेब गवारे, सैन्य दलातील निवृत्त सैनिक सोमनाथ ताके, कैलास कोठुळे, भगिरथ पवार, भारतीय सैन्य दलातील आशितोष यादव, संदिप यादव, सोपानराव गवारे, साईनाथ गवारे, माजी मुख्याध्यापक जगताप, माने सर व सर्व शिक्षक बंधू -भगिनी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.