अहिल्यानगर
देवळालीतील सर्वसामान्य जनतेला व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न – दत्तात्रय कडू पाटिल
देवळाली प्रवरा : गांवगाडा आज तसा संथ सुरु झाला न् संथ अस्ताला गेला. आज नुतन मुख्याधिकारी न् शाळेच्या प्राचार्यांची नियोजित भेट झाली नाही. प्राचार्य संस्थेच्या कामासाठी अहमदनगरला होते फोनवरुन चर्चा केली. शाळेची सद्यस्थिती, कोराना संसर्गाची घेत असलेली खबरदारी. मुलांच्या घटक न् सत्र परिक्षांचे नियोजन याबाबत चर्चा केली. बाकीचे महत्वाचे विषय समक्ष भेटीत बोलण्याचे ठरवले. नुतन मुख्याधिकारी यांना गावाचा कारभार समजायला किमान आठदिवस लागतील. त्यानंतर आपल्याला अभिप्रेत गावाच्या विकासांचे महत्वाचे मुद्दे व त्यानुसार आखण्याच्या धोरणांचे सविस्तर निवेदन हेल्फ टिमच्या वतीने देण्यात येईल. यात शेवटटचा घटक लक्षात घेवुन काही महत्त्वाच्या योजना सुचवयाच्या आहेत. त्याबाबत त्यांचेंशी बोलुन त्यांचे सहकार्य घेत त्या योजना पुढे नेण्याचा प्रयत्न करु. आता देवळालीकरांनो प्रश्न पडला असेल ह्या लष्कराच्या भाकरी आम्ही का भाजत आहोत. आमचा राजकारण पुर्णवेळ धंदा नाही. गावकीत विरोधक व सत्ताधिश एकमेंकाचे मने दुखावायला तयार नाहीत. मग सर्वसामन्य घटक हतबल झालेत. त्यांना व्यासपीठ मिळवुन देण्याचे काम आम्ही सुरु केले आहे.
रात्री आप्पासाहेब ढुस यांनी गांवातील घनकच-याच्या अनुषंगाने गेल्या पाच वर्षांची आकडेवारी टाकली. त्यावर गावांत बरीच चर्चा झाली. कुणी म्हणाले एवढा खर्च केला म्हणुन गांव स्वच्छ राहिले. देशात गावाचे नांव झाले. मी तर पहिल्यापासून या खोट्या बडेजावाच्या विरोधात आहेत, मुळात हि नगरपालिका अर्धवट आहे ना आरोग्य सेवा ताब्यात ना प्राथमीक शिक्षण आणखी जि प ची कृपा आहे. यावर कुणी काम केले नाही न् त्या अंगाने विचार केला नाही. गावाचा गावठाण छटाक.न् लोकसंख्या वाड्या वस्त्यांवर पसरलेली. ८०% टक्के जनता शेतात रहात असताना ते कच-याची विल्हेवाट त्यांची तेच करतात. मग राहुरी फॅक्टरीची दाट लोकसंख्या न् गावातील १ कि मी परिघात असलेले शहरवासीय यांचेसाठी हा खर्च म्हणजे जरा जास्तच होतो आहे. पाच वर्षापुर्वी असलेला १५ लाख खर्च पावणेदोन कोटीच्या घरात जाणे. हा अभ्यासाचा मुद्दा आहे. आता यात काय काय खर्च केला कश्यावर केला. हे तुम्ही तपासा. नसेल तपासायचे तर वाचा न् शांत बसा.
आज मोकळ्या मैदानात डबलबार सिंगल बार मोकळ्या बसविले आहेत. जीम जवळपास तयार आहे. टे्नर ठरला आहे. त्याचा मासीक पगार न् मेंटेन्स याचा ताळमेळ घालत माफक दरात दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न आहे. गेल्या दोन महिन्यापुर्वी हेल्फ टिमने मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यात वाड्या वस्त्यांवर खुल्या जीम व महिलांसाठी शहरात जीम सुरु करण्याची मागणी केली होती. त्यावेळेसच त्यांनी महिला जीमचे साहित्य आले आहे. सध्या कोवीड सेंटर आहे तेथे महिला जीम सुरु करण्याचे ठरले असल्याचे सांगितले. काल त्या जीमचे उद्घाटन झाले. आज तिथे मुलांची तोबा गर्दी. मग मुख्याधिकारी महोदय तुम्ही आम्हाला चुकीची माहिती तर नाही दिली कि ती महिलांसाठी होती म्हणुन. तसा देवळालीत महिला न् त्यांच्या सुविधा दुर्लक्षीत आहेतच.
आता काही गोष्टी तुमच्या समोर आणणे गरजेचे. बारवेजवळ अगोदर तिथे असलेले घिसाडी, आदिवासी गरिब लोकांची घरे हटवुन छान टुमकदार मंडई बांधली. तिला सुंदर गेट न् छान कंपाऊंड केले. पण तिथे काय एक भाजीवाला बसला नाही.ना मंडई बसली. ती मंडई उचकवली हुतात्मा शिरिषकुमार बालउद्यान बनविले. मस्तपैकी छोटी मोठी आबालवृध्द तेथे बसत असत. आनंदाचे चार क्षण घालवत होते. उद्यान गायब केले न् तिथे टोलेजंग इमारत बांधली. आता हि कश्यासाठी बांधली देव जाणे. तिचा उपयोग नगरपालिकेने कोवीड सेंटरसाठी केला. तिथे तिस-या लाटेसाठी ९० लाखाची तरतुद करुन ॲाक्सीजन प्लॅन्टसह नगरपालिकेचे कोवीड सेंटरचा ठराव झाला. तिसरी लाट आली नाही ती येवु नये हि पांडुरंगचरणी प्रार्थना. तिथे सुसज्ज कोवीड सेंटर ९० लाखाची तरतुद असल्याने आत्ताच तयार ठेवणे अभिप्रेत असताना तुघलकी कारभार करत तिथे जीम उभारली. मुख्याधिकारी म्हणतात ती तात्पुरती आहे जीम. लाट आली तर ती जीम हलवुन कोवीड सेंटर सुरु करु. काय बोलावे. हसावे कि रडावे. एकाच जागेवर विकासांचे किती जादुचे प्रयोग. हा नियोजनशुन्य प्रशासनात नमुना आहे. त्यापेक्षा देवळालकरांनो तुम्ही डोळे मिटुन थंड आहात त्याचा परिपाक आहे. पहा वाचा न् थंड बसा.
दत्तात्रय कडू पाटील, माजी सनदी अधिकारी