अहिल्यानगर
विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गरज -सरपंच जाधव
आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : कोरोणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा सावरण्यासाठी ज्ञानदानाची गरज आहे, असे मत आरडगांव ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच कर्णा जाधव यांनी व्यक्त केले आहे.
राहुरी तालुक्यातील आरडगांव येथील गावठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप प्रथम लोकनियुक्त सरपंच कर्णा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक रेवनाथ शेळके हे होते. यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपण निर्णय करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच आनंद वने, मच्छिंद्र भुसारे, बाबासाहेब जाधव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उपस्थित होते.