अहिल्यानगर

राहुरी कॉलेज येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी तालुका विधी सेवा समिती व राहुरी तालुका वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्ट्स सायन्स & कॉमर्स कॉलेज राहुरी येथे आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमा अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वतीचे पुजन करुन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेज च्या उपप्राचार्य प्रा.डॉ.भारती नवथर या होत्या. प्रमुख पाहुणे राहुरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती असावरी वाडकर या होत्या. प्रमुख उपस्थित राहुरी तालुका बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. मच्छिंद्र देशमुख, अध्यक्ष ज्ञानदेव तोडमल, कॉलेज चे प्राचार्य संभाजी पठारे, रहुरीचे पो. नि .राजेंद्र इंगळे, सरकारी वकील रविंद्र गागरे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.साधना मॅडम यांनी केले.
ॲड. शोभा रणवरे यांनी रॅगिंग कायदा या विषयी माहिती दिली. ॲड. प्रकाश संसारे यांनी मोफत व सक्तीचे शिक्षण या विषयी माहिती दिली. पो.नि. इंगळे यांनी मुलींनी होणाऱ्या अत्याचारांच्या सबंधी निसनकोच पणे तक्रार द्यावी, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल, अन्याया विरोधात तक्रार देण्याचे आवाहन केले. प्राचार्य संभाजी पठारे यांनी कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षेचे दृष्टीने अनेक विविध योजना राबविलेल्या आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहुरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती असावरी वाडकर यांनी आपल्या भाषणात राहुरी कॉलेजचा निसर्गरम्य परिसर पाहून कॉलेज मधील सुखसुविधा याबाबत समाधान व्यक्त करून आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमा अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे माध्यमातून आज कॉलेजचे मुलींशी हितगुज करायला मिळाले तसेच उद्या होणारे बालदिनाच्या आजच सर्वांना शुभेच्छा देऊन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कवितेच्या विद्या बाबतचे महत्व सांगणारे दोन ओळी विशद केल्या की, विद्ये वीणा मती गेली, मती वीणा गती गेली,गती वीणा वित्त गेले. असे सांगून मुलींनी भरपूर शिक्षण घेऊन उच्च पदस्थ, अधिकारी होऊन समाजात निर्भय पणें वागावे असे आव्हान करून या कार्यक्रमाचे सार्थक झाले असे बोलून कॉलेज च्या स्थुत्य उपक्रमा बाबत समाधान व्यक्त करून कौतुक केले.
कार्यक्रमास उपस्थित ॲड.राहुल शेटे, ॲड. नानासाहेब तनपुरे, ॲड. रविंद्र गगरे, ॲड. पल्लवी कांबळे, ॲड. सविता गांधले, ॲड. कल्याणी कोल्हे, ॲड.अनिता तोडमल, ॲड.स्वाती सांगळे सह कॉलेज चे प्राचार्य त्यांचा संपूर्ण प्राध्यापक स्टॉप महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच विधी सेवेचे विकास जाधव, वैशाली सोनवणे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button