ठळक बातम्या

सरपंच,उपसरपंच यांना कोंडले कार्यालयात

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडेउंदीरगाव येथील विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी विविध मागण्यासाठी उंदीरगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व उपसरपंच यांना बाहेरून कुलूप लावून कोंडले होते. अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आले.
    ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ताके व योगिता निपुंगे यांनी उंदीरगाव ग्रामपंचायत कोणतेच काम वेळेवर पूर्ण करीत नाही, केलेले काम हे चांगल्या दर्जाचे नाही. महिन्यापासून ग्रामस्थांना वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नाही. चार महिने मशीन बसविले पण सुरु केले नाही. सार्वजनिक शौचालय ५ महिन्यापासून बांधले तरी नागरिकांना वापरण्यास खुले केले नाही. या मागण्यासाठी कार्यालयास टाळे ठोकले. सरपंच सुभाष बोधक व उपसरपंच रमेश गायके हे लिपिक,कार्यालयात असताना कोंडले गेले. या आंदोलनप्रसंगी दिलीप गलांडे, बाळासाहेब घोडे, अमोल नाईक, किशोर नाईक, मनोज बोडखे, बाळासाहेब निपुंगे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button