कृषी
कृषि विद्यापीठ कर्मचार्यांकडून पूरग्रस्त भागासाठी मदत
राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकर्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. सदर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या पुढाकारातून सर्व कर्मचार्यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे सांगितले. यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाने या कामी सहकार्याची भुमिका घेऊन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला. कर्मचार्यांच्या एक दिवसाच्या वेतनाची रक्कम कृषि मंत्री ना. दादाजी भुसे यांचे मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी सांगितले. यावेळी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर, उपाध्यक्ष डॉ.उत्तम कदम, डॉ.संजय कोळसे, मच्छिद्र बाचकर, संजय ठाणगे, जनार्दन आव्हाड, गणेश मेहेत्रे, महेश घाडगे, बाबासाहेब अडसुरे उपस्थित होते.