महाराष्ट्र
डिजिटल पेमेंट वरील शुल्क रद्द करा- अखिल भारतीय क्रांतीसेनेची मागणी
वाळूज महानगर/औरंगाबाद: लाॅकडाऊनमुळे महाराष्ट्रातील नागरिकांची आर्थीक स्थिती ढसाळलेली असल्याने व नोटांद्वारे विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डिजिटल पेमेंट वरील शुल्क रद्द करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे ई-मेल द्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,आज रोजी सर्वच ठिकाणी जवळपास संपूर्ण भारतात कोरोना विषाणु संसर्गाचे सावट पसरले आहे. त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या कठीण काळात संपूर्ण देश एकसंघ झालेला आहे व आपले महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्तीनिशी या अनपेक्षित संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेले आहे. प्रसंगी शासन प्रणाली जे शक्य असेल त्या प्रमाणे निर्णय घेतही आहात.अशातच जिवनाश्याक वस्तु खरेदी केल्यावर नागरिकांकडुन आर्थीक व्यवहार काही प्रासंगिक वेळी रोख स्वरुपात तर काही ठिकाणी डिजिटल स्वरुपात ही केला जातो.आजच्या स्किल इंडिया, डेव्हलप इंडिया च्या पार्श्वभूमित डिजिटल व्यवहार करणे सोपेस्कर/सोइस्कर आहे.तसेच आजची काळातील गरज लक्षात घेता डिजिटल व्यवहार अत्यावश्क झाले आहे. आणि रोख स्वरूपात व्यवहार करत असताना पैशाच्या/नोटांच्या माध्यमातून कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याचा धोका ही संभवू शकतो.आपण तसे सर्व जनतेस शक्य असल्यास डिजिटल पेमेंट करण्यासाठी आवाहन पर सुचविलेही आहेच. पण डिजिटल पेमेंट करत असताना काही ठिकाणी त्या मशीन स्वरूपात किमान 02 % (दोन टक्के) या प्रमाणे अतिरिक्त चार्ज आकारला जातो. या अनुषंगाने आपणास या निवेदनाद्वारे नम्र विनंती करण्यात येते की, किमान लाॅकडाउन व पुढील सहा महिन्यापर्यंत आणि अत्यावश्यक सेवा आहेत त्याठिकाणी तरी या डिजिटल पेमेंट वर अतिरिक्त चार्ज नाकारण्यात यावा. अशा सूचना आपण संबंधित प्राधिकरणास किंवा बँक अखत्यारीत व्यवस्थेस देण्यात याव्या. या निर्णयाचे महाराष्ट्रातील तमाम जनते कडून स्वागत होईल व डिजिटल पेमेंट करण्यासाठी प्रोत्साहनही मिळेल व अत्यावश्यक सेवेतील पैशाच्या/नोटांच्या स्वरूपात विषाणु संसर्ग कमी होईल.
या निवेदनावर अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे सरचिटणीस नितिन देशमुख,जिल्हा अध्यक्ष मनोहर निकम,वाळूज महानगर अध्यक्ष दिनेश दुधाट,उपाध्यक्ष वाळूज महानगर दिपक गायकवाड,जिल्हा संघटक राजू जिजासाहेब शेरे,वाळुज महानगर युवा अध्यक्ष औंदुबर देवडकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.