अहिल्यानगर
जनसेवा फाउंडेशन तर्फे संविधान दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; शिक्षणासोबतच संस्कार महत्त्वाचे – पोलीस निरीक्षक जायभाये
अहमदनगर/ जावेद शेख : जनसेवा फाउंडेशन तर्फे संविधान दिनानिमित्त बोरगाव बु. येथे आयोजित कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जनसेवा फाउंडेशन च्या वतीने गौरवशाली कार्य म्हणून जायभाये, मुख्याध्यापक यांचा सुद्धा प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून त्यानंतर सामूहिक संविधान वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना जाफराबाद पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांनी आजच्या काळात शिक्षणासोबतच संस्कार महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून विधीज्ञ श्री विष्णू शिंदे, मुख्याध्यापक बी एल देशमुख व ए व्ही जगताप यांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नैसीनबी शेख, वैष्णवी जाधव, शीतल जोशी, हीनाबी शेख, पूजा जोशी, सुषमा वाघ, पल्लवी शिंदे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सोमनाथ चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर संदीप जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसेवा फाउंडेशन चे हर्षल पा फदाट, राहुल फदाट, गौतम वाहुळे, प्रमोद पैठणे, शकिल शेख ओम खंदाडे, संदेश फदाट, सुरज जंजाळ, अंबादास फदाट, सुनील फदाट यांनी विशेष परिश्रम घेतले.