अहिल्यानगर

चिंचोलीत विठ्ठलनामाची शाळा भरली

राहुरी / बाळकृष्ण भोसले – प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील चिंचोली येथील स्व. जनार्दन काळे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह विविध सामाजिक विषय हाती घेत गावातून विठुमाऊलीच्या जयघोषात व टाळ, मृदूंगाच्या निनादात भक्तिरसात न्हाऊन निघत लक्षवेधी दिंडीचे आयोजन केले.

व्हिडिओ पहा:-

सुरूवातीला स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष गणेश लाटे सह सदस्य यांनी या दिंडीचे स्वागत करून शिक्षक व विद्यार्थ्यांनी दिंडीचे आयोजन करून आज मानवाला भेडसावत असलेल्या समस्या या बालगोपाळांच्या मेळ्यातून जाणिवपूर्वक मांडल्याबद्दल शिक्षकांचे कौतुक करत जनतेने अशा सामाजिक प्रश्नांकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले. 
प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या दिंडीत वृक्ष लागवड, महिला सक्षमीकरण, पाणी बचत, अंधश्रद्धा निर्मूलन, पशुपक्ष्यांचे संगोपन व संवर्धन आदी विषय हाती घेत विठुमाऊली प्रत्येक मानवाला याविषयी सदबुध्दी देत माणसाने माणसाशी माणसासारखे वागण्याची शक्ती देण्याचा मार्मिक संदेश दिला या दिंडीच्या माध्यमातून एकुणच विठ्ठलनामाची शाळा भरल्याचा प्रत्यय जाणवला. 
या  दिंडीच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक आण्णासाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सर्वश्री पर्यवेक्षक अलका गायकवाड, संजय बिडवे, हनुमंत गिरी, प्रकाश गाडेकर, विलास गिते, सुधाकर कोबरणे, संजय शेलार, भाऊसाहेब कडू, मारूती पिचड, दिगंबर जाधव, लिला खपके, सुषमा पाटील, राणी राजगुरु, नामदेव पांढरकर, सुमित वने, सुनील तारू, आहेर सर, चव्हाण सर, वाणी सर, कोरडे सर, शेंडगे सर, सुनील कटारिया, नानासाहेब राऊत, बाबासाहेब वाघ यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button