अहिल्यानगर
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी…

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव या महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद आहिरे उपस्थित होते. डॉ. मिलिंद अहीरे यांच्या शुभहस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जयंतीच्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे डॉ. मनोज गुड, डॉ. प्रेरणा भोसले, प्रा. कीर्ती भांगरे, सौ.अंजली देशपांडे सौ. वैशाली पोंदे, सौ.सासवडे व अमृत सोनवणे उपस्थित होते.