अहिल्यानगर
आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने मानोरी येथे जागरूकता शिबिराचे आयोजन
आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील गावागावांत इंडिया जागरूकता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने मानोरी येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवि दिल्ली तसेच महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार कार्यक्रमा निमित्ताने जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी राहुरी तालुका विधी सेवा समिती प्राधिकरण पॅनल सदस्य ॲड.मनीषा राजाराम आढाव यांनी बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार 2009, मध्यस्थी केंद्र लोकन्यायालय, गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा, रॅगिंग प्रतिबंधक कायदा, मोफत विधी सहाय्य या विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सरपंच अब्बासभाई शेख, उपसरपंच मनिषा आढाव, शिवाजी थोरात, पोलीस पाटील भाऊराव आढाव, नवनाथ थोरात, पीरखाभाई पठाण, सुनील पोटे, बापुसाहेब वाघ, भाऊसाहेब आढाव, बाबुराव मकासरे, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.