क्रीडा

क्रीडा क्षेत्रात आदिवासी समाजाला मोठी संधी : आप्पासाहेब ढुस

देवळाली प्रवरा प्रतिनिधीक्रीडा क्षेत्रात आदिवासी समाजाला मोठी संधी असून आदिवासी संघटनेने त्या दिशेने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी केले.

       देवळाली प्रवरा येथील व तालुक्यातील आदिवासी समाज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा विनिमय करण्यासाठी आयोजित केलेल्या एकलव्य संघटनेच्या तालुका स्तरीय बैठकीत आप्पासाहेब ढुस बोलत होते. या प्रसंगी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा संघटनेचे जेष्ठ नेते आप्पासाहेब गोलवड, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष जयेश माळी, दक्षिण नगर जिल्हा अध्यक्ष गिताराम बर्डे, सतीश भांड, सतीश डोळस, नाना शिंदे, तालुका कार्याध्यक्ष विजय सूर्यवंशी तसेच राहुरी तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
      या प्रसंगी बोलताना ढुस पुढे म्हणाले की, आदिवासी बांधवांच्या तीन पिढ्या सोबत आमचे बालपण गेले असल्याने समाज्याच्या सर्व अडीअडचणी आम्ही जवळून पाहिल्या आहेत, त्या सोडविणेसाठी आम्ही सदोदित प्रयत्नशील आहोत, थोडेसे मार्गदर्शन मिळाले तर तिरंदाजी सारख्या खेळात आदिवासी बांधव खूप लवकर पुढे जाऊ शकतो, कारण तिरंदाजी त्यांच्या नस नसात भिनलेली आहे, तिरंदाजी आणि नेमबाजी त्यांना बालपणापासून अवगत असते. त्यामुळे संघटनेने असे खेळाडू शोधून त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी आमची गरज लागेल तेथे आदिवासी बांधवांनी कधीही आवाज द्यावा. आम्ही त्यांच्या मदतीला हजर असू असे आश्वासन ढुस यांनी शेवटी बोलताना दिले.

Related Articles

Back to top button