सामाजिक
तृतीयपंथी समाजास पेन्शन योजना सुरू व्हावी : कैलास पवार
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) :
भूमि फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि मंगलमुखी किन्नर चारिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने पुणे जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची भेट घेऊन सर्व तृतीयपंथी समाज यांना पेन्शन योजना लागू करावी त्याचबरोबर या समाजास मेडिक्लेम व स्किल डेव्हलपमेंटसाठी कार्यशाळा आणि सर्व तृतीयपंथीयांना आयडेंटी देण्यात यावे इत्यादी स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या. यावेळी डॉ.राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे यांनी या मागण्याकरिता सकारात्मकपणे भावना दाखवून सदर मागण्या पैकी ज्या ज्या शक्य आहे त्या त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू म्हणून आश्वासन दिले. या बैठकीस उपस्थित भूमि फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास पवार व मंगल मुखी किन्नर चारीटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने आशीका पुणेकर, रामोला दीदी, ऐश्वर्या दीदी तसेच उद्योजक तुषार सातव इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी तृतीयपंथी समाज यांच्या मागण्या समजून घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल अशा वक्तव्यावर भूमि फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास पवार त्याचबरोबर मंगल मुखी किन्नर चारीटेबल ट्रस्ट सर्व पदाधिकारी आणि सर्व किन्नर समाज यांनी आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांचे आभार मानले.