अहिल्यानगर
एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी पक्षाची १८ ला मोर्चेबांधणी
नगर प्रतिनिधी : एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी पक्षाची राज्य, अहमदनगर जिल्हा व तालुका कार्यकारिणी लवकरच जाहीर होणार आहे. कार्यकारणीतील सहभागा संदर्भात इच्छुकांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आव्हान संस्थापक अध्यक्ष रेवणनाथ जाधव यांनी केले आहे.
अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहात १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. महाराष्ट्र राज्य एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी पक्षामार्फत राजकीय व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. चांगले विचाराची माणसें, पक्षात काम करण्याची आवड, धडपड करणारी माणसे जोडून सर्वांना चांगल्या प्रवाहात आणण्यासाठी व अन्याय विरोधी लढ्यात राहणाऱ्या निष्ठावंत कार्यकत्यांना सोबत घेऊन काम करण्याचे पक्षामार्फत काम केले जाणार आहे. तरी राज्यातील व अहमदनगर जिल्हा तसेच तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.