अहिल्यानगर

शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी म्हसे, कार्याध्यक्षपदी कदम

शिवजयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबीर व खेळ पैठणी कार्यक्रमाचे आयोजन

राहुरी  प्रतिनिधी – राहुरी येथे मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित शिवजयंती उत्सव समिती गठित करण्यात आली असून, २०२५ साठी अध्यक्षपदी जनार्धन उर्फ बंडुशेठ म्हसे आणि कार्याध्यक्षपदी अशोक कदम यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष म्हणून किरण पाटील, खजिनदार ईश्वर गाढे आणि सचिव अरुण निमसे यांची निवड सर्वानुमते झाली.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी सांगितले की, शिवजयंती उत्सव समिती गेल्या दहा वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. त्याच उद्देशाने १९ फेब्रुवारी २०२५ रोजी पांडुरंग मंगल कार्यालय, राहुरी येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत भव्य आरोग्य शिबिर, महिलांसाठी गृहउपयोगी स्टॉल आणि सायंकाळी ५ वाजता “खेळ पैठणी” हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

तसेच वैद्यकीय, सामाजिक आणि शेतकी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या प्रसंगी करण्यात येणार आहे. आरोग्य शिबिरात डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल, लाईफ इन हॉस्पिटल राहुरी आणि ग्रामीण रुग्णालय राहुरी येथील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून, डॉ. विक्रम खुरुद हे गंभीर रुग्णांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.

लांबे यांनी आरोग्य शिबिराच्या महत्त्वावर भाष्य करताना सांगितले की, हल्ली हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः ३० ते ५० वयोगटातील लोकांमध्ये हा धोका जास्त असल्याने शारीरिक तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शिवजयंती कार्यक्रम नियोजन समितीमध्ये अविनाश क्षीरसागर, कुलदीप नवले, संदीप गाडे, रोहित नालकर, विजय पटारे, ईश्वर गाढे, दिलीप घुमे, मेजर नामदेव वांढेकर, विनायक बाठे, निखील कोहकडे, सुभाष पवार, रामदास कटारे, मधुकर घाडगे, विजय कोहकडे आणि सुनील निमसे यांची निवड करण्यात आली आहे. या शिवजयंती उत्सव आणि आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन उत्सव समितीने नागरिकांना केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button