मनसेचे सचिव सचिन मोरे शनी महाराजांच्या चरणी नतमस्तक

सोनई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सचिव आणि राजसाहेब ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक सचिन मोरे यांनी शनिशिंगणापूर देवस्थान येथे अभिषेक करून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मनसे पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि राजसाहेब ठाकरे यांच्या उत्तम आरोग्यासाठी शनी महाराजांना प्रार्थना केली.
राहुरी तालुक्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला राहुरी मनसे शहराध्यक्ष प्रतीक विधाते, तालुकाध्यक्ष मनोज जाधव, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, मनवीसे संघटक सागर माने, उपतालुकाध्यक्ष राहुल पिले, राजू आढगळे, संदेश पाटोळे, शरद वाघ, सागर नालकर आदी मनसैनिक उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी मनसे पक्षाच्या भरभराटीचे यश प्राप्त होण्यासाठी आणि राज्यात पक्षाचा अधिकाधिक विस्तार व्हावा यासाठी प्रार्थना केली. शनिशिंगणापूरच्या पवित्र वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने सर्व मनसे सैनिकांमध्ये उत्साह संचारला.