राजकीय

राहुरीच्या कट्ट्या कट्ट्यावर चर्चा! शिवाजीराव कर्डिले होणार आमदार!

राहुरी : राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवाजीराव कर्डिले तर महाविकास आघाडी कडून प्राजक्त तनपुरे मुख्य रिंगणात असून निवडणुकीचा बिगुल वाजुन प्रचाराला सुरुवात झालेली आहे.

मात्र राहुरी शहराच्या कट्ट्यावर तालुक्यातील सुज्ञान नागरिकांकडून राहुरी नगर पाथर्डी विधानसभेचा कल जाणून घेण्यासाठी आम्ही शहराच्या कट्ट्यावर उतरलो तेव्हा महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाची चर्चा नागरिकांमध्ये रंगताना दिसत होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राहुरी शहरातील नागरिकांकडून या निवडणुकीतील कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा नागरिकांची संवाद साधत असताना शिवाजीराव कर्डिलेच का पाहिजे आमदार असा प्रश्न नागरिकांना केला असता तर शहरातील नागरिकांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या राहुरीतील जनता दरबारामध्ये आम्ही आमचे प्रश्न घेऊन गेल्यावर शिवाजीराव कर्डिले एक फोन लावतात आणि लगेच आमचा प्रश्न चुटकीसरशी सोडविला जातो अशी मते काही नागरिकांनी व्यक्त केली. तर काही नागरिकांनी शिवाजीराव कर्डिले यांना समाजातील तळागाळातील प्रश्नांची जाण असुन गरीबीमध्ये वाढलेले असल्याने त्यांना गरिबांच्या कष्टाची जाणीव आहे. त्यामुळे शिवाजीराव कर्डिले हेच सर्वसामान्यांच्या व्यथा समजू शकतात असे काहींनी म्हटले.

नागरिकांनी बोलताना सांगितले की, शिवाजीराव कर्डिले जनतेच्या सेवेसाठी 24 तास अविरत सेवेत असतात. त्यांचा फोन नेहमी चालू असतो, दवाखान्यासाठी असो अथवा इतर कोणत्याही कामासाठी असो शिवाजीराव कर्डिले यांना फोन केला की लगेच प्रॉब्लेम सुटतो, असे नागरिकांनी म्हटले आहे.

दरम्यान याबाबत निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून यामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले मात्र प्रचारामध्ये आघाडी घेऊन नागरिकांच्या चर्चेमध्ये त्यांचे नाव प्रथम स्थानी ऐकायला मिळताना दिसत आहे.

Related Articles

Back to top button