ठळक बातम्या

राहुरी ग्रामिण रुग्णालयातच दिव्यांग व्यक्तींची तपासणी व प्रमाणपत्र – उर्जा नगरविकासमंत्री ना. प्राजक्त तनपुरे

राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीकरीता आता जिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्र घेण्यासाठी व शारीरीक तपासणी करण्याची गरज पडणार नाही . आता राहुरी येथील ग्रामिण रुग्णालयातच दिव्यांग व्यक्तीचे शारीरीक तपासणी करुन प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे राज्याचे उर्जा नगरविकासमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
मागिल आठवड्यात पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित सदरचा निर्णय झाला असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. जिल्हातील दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या योजनेचा विविध लाभ घेण्यासाठी ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्राची आवश्यकता असते. याआधी दिव्यांग व्यक्तींचे शारीरीक तपासणी व प्रमाणपत्र फक्त जिल्हा रुग्णालयातुनच दिले जात असे परंतु दिव्यांगाना होणा-या त्रासाचा शासनाने गंभीर विचार करुन त्या त्या तालुकास्तरावर ग्रामिण रुग्णालयात सदरची शारीरीक तपासणी करुन प्रमाणपत्र वितरीत करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.
राहुरी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींनी राहुरी येथील ग्रामिण रुग्णालयात जाऊन तेथे आपली शारीरीक तपासणी करुन व त्यासंबंधीचे लागणारे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट साईज 2 फोटो, रहिवासी दाखला इ. मुळ व झेरॉक्स कागदपत्रे देवुन आपली शारीरीक तपासणी करून घ्यावी तसेच ज्या दिव्यांगानी पुर्वी ऑफलाईन दिव्यांग प्रमाणपत्र काढलेले असेल तर त्यांनी सदरचे मुळ प्रमाणपत्र व आधार कार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट साईज 2 फोटो, रहिवासी दाखला मुळ प्रत व झेरॉक्स घेवुन येवुन ऑनलाईन प्रमाणपत्र काढणे करीता गुरुवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वा. शिवीर आयोजीत केलेले आहे. तरी सदर कागदपत्रे घेवुन राहुरी येथील ग्रामिण रुग्णालयात संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांचेकडे जमा करावे. तसेच ज्या दिव्यांगानी ऑनलाईन प्रमाणपत्र काढलेले आहे अशा दिव्यांगानी या शिबीरात येण्याची आवश्यकता नाही असे अवाहन मंत्री तनपुरे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button