हिरडगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी दिपाली दरेकर यांची बिनविरोध निवड
श्रीगोंदा | सुभाष दरेकर : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या हिरडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत दिपाली दरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे जनरल महिलेसाठी राखीव आहे. सौ.सुनिता अनिल दरेकर ह्या या पदावर विराजमान झाल्या. सुमारे अडीच वर्षांनंतर मनाचा मोठेपणा दाखवून इतरांनाही संधी मिळावी या उदात्त हेतूने त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आणि आज सौ.दिपाली नाना दरेकर यांची बिनविरोध निवड झाली.
सौ.दिपाली दरेकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले सदस्य चिमाजी आप्पा दरेकर, अमोल विलास दरेकर, सौ. सुनिता अनिल दरेकर, सौ. विद्या रामदास बनकर आदींसह सर्व घडामोडी पार पाडण्यासाठी अनेक ज्ञात, अज्ञात हातांनी मदत केली. विशेषतः सोसायटीचे चेअरमन झुंबराव दरेकर, सामाजिक कार्यकर्ते संपत आण्णा दरेकर, कुकडी सल्लागार समितीचे सदस्य मिलीद दादा दरेकर, युवा नेते संतोष दरेकर, सुभाष दरेकर, रामदास बनकर, ईश्वर दरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यमान पंचकमिटीच्या हातुन गावच्या विकासात भर पडो अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
या निवडीचे काष्टी सेवा सोसायटीचे माजी मॅनेजर बाळासाहेब दरेकर, मा सरपंच दत्तात्रय भुजबळ, ज्ञानदेव दरेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक भरत भुजबळ, सोसायटीचे व्हा. चेअरमन कैलास दरेकर व सर्व संचालक मंडळ व हिरडगाव ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.