दादासाहेब पवार यांना महाराष्ट्र समता गौरव पुरस्कार जाहीर
राहुरी : तालुक्यातील तांभेरे येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांना नुकताच जनहित फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र समता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
परभणी येथे 9 ऑगस्ट 2023 रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून जनहित फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्र समता गौरव पुरस्कार वितरण सोहळा हॉटेल विसावा कॅफे पार्क परभणी या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा विनोद सम्राट चित्रपट निर्माते विजय पाटकर तर या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताच्या माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री गणेश रावजी दुधगावकर, अँटी करप्शन कमिटीचे नॅशनल अध्यक्ष रवींद्रजी दिवेदी, परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव, गंगाखेड आमदार रत्नाकर गुट्टे, परभणी आमदार राहुल पाटील, विशेष सत्कारमूर्ती परभणी जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी श्री गावंडे, पोलीस अधीक्षक, उपप्रदेशिक परिवहन अधिकारी श्रीमती स्वामी मॅडम आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा वितरण होणार आहे.