धार्मिक

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रेमभक्ती आणि संस्कृती शक्ती देणारे- ह.भ.प. सखाराम कर्डिले महाराज

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : प्रा. नंदकिशोर कुऱ्हे यांनी उभारलेले श्रीविठ्ठल रुक्मिणी हॆ सामाजिक, आरोग्यशील, पर्यावरण, प्रेमभक्ती आणि संस्कृती शक्ती देणारे असल्याचे मत ह.भ.प. प्रा. सखाराम कर्डिले महाराज यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील नॉदर्न ब्रँच परिसरातील पाटचारी प्रांगणात बांधलेल्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर उद्घाटन भक्तीपूजेप्रसंगी ह.भ.प. प्रा.सखाराम कर्डिले महाराज बोलत होते. प्रारंभी श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा विधिवत पूजन, आरती करण्यात आली. प्रा.नंदकिशोर कुऱ्हे यांनी विजयानंद सरगम ग्रुप, पार्वती प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन स्वागत केले.

बँक ऑफ बडोदा व्यवस्थापक रवींद्र हरकल यांनी सर्वांचा शुभ्रवस्त्र आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी भगिनी स्व.सौ.विजयाताई कुऱ्हे यांच्या मनातले भक्ती आणि समाजशक्ती मंदिर केंद्रांचे स्वप्न पूर्ण झाले. त्याबद्दल आनंद व्यक्त केला.

साहित्यिक प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी श्रीविठ्ठल एक महासमन्वय असून वारकरी संप्रदाय आणि भक्तीतत्व सांगून प्रा.कुऱ्हे यांचा पुस्तके देऊन सत्कार केला. यावेळी माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी आपल्या घरातील वारकरी परंपरा आणि पंढरपूर हॆच बालपणापासून कसे संस्कारतीर्थ आहे, याबद्दल आठवणी सांगितल्या. स्व.प्रा.सौ. विजयाताई कुऱ्हे यांना पंढरीच्या वारीत सतत सहभागी होण्याची उत्कट इच्छा असे. या मंदिराच्या रूपाने हॆ कार्य झाले आहे.

विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी सांगितले की, आपल्या बोरावकेनगर निवासस्थान परिसरात लवकरच शिवलिंगची स्थापना करणार असल्याचे सांगून प्रा.कुऱ्हे यांचे कौतुक केले. यावेळी डॉ.मदन सोमाणी, प्रा.सौ.मंजिरीताई सोमाणी, सुभाष वाघुंडे, पत्रकार राजेंद्र देसाई, डॉ.सीताराम लबडे, सौ. माई लबडे, संजय पगारे आदी उपस्थित होते. प्रा.कुऱ्हे यांच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी व श्री हनुमान मंदिराच्या उभारणीबद्दल अनेक भक्त व परिसरातील नागरिकांनी विशेष कौतुक केले.

प्रा.कर्डिले महाराज पुढे म्हणाले, प्रा.नंदकिशोर कुऱ्हे यांनी मंदिराच्या माध्यमातून परिसरात संस्कृती आणि समाजशिक्षण सुरु केले. स्वच्छता आणि निर्मळपणा यांना भक्ती प्रेरणास्थळ उभे केले, हॆ स्तुत्य कार्य आहे, असे सांगून कुऱ्हे परिवाराला धन्यवाद दिले. यावेळी मंदिर कार्य करणारे विश्वनाथ कुमावत मिस्तरी यांचा सत्कार करण्यात आला. कमल भागुजी कुऱ्हे, डहाणूकर विद्यालय प्रशाकीय व माजी मुख्याध्यापिका सौ. वंदनाताई हरकल, विमलताई कुऱ्हे, मच्छिंद्र मोढे, शशिकांत मुळे, दत्तात्रय कुऱ्हे, संजय पगारे, कांतीलाल कुऱ्हे आदिंनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रा. नंदकिशोर कुऱ्हे यांनी स्व. सौ. विजया कुऱ्हे यांच्या शैक्षणिक, सामाजिक योगदानाचे हॆ सेवाभावी पुण्यस्मरण असल्याचे सांगून आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button