दिव्यांग व्यक्ती व पालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर, अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर, आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र व श्रीरामपूर आयुर्वेदीक प्रॅक्टिसन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त युवक कल्याण योजनेअंतर्गत रविवार दि. 16 एप्रिल रोजी सकाळी ठीक 9 वाजता सहर्षा हाॅल, बोंबले पाटील नगर, रासकर नगर जवळ, म्हाडा कॉलनी शेजारी, श्रीरामपूर येथे दिव्यांग व्यक्ती व पालकांकरिता मोफत आयुर्वेदिक तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे व महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन अध्यक्ष डॉ सतिष भट्टड यांनी दिली.
सदर शिबिराचे उदघाटन आ.डॉ सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूरचे डीवायएसपी संदिप मिटके असणार आहेत. कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, माजी नगरसेवक अशोक कानडे, सामाजिक कार्यकर्ते योगेश जाधव, रिपाइंचे विभागीय जिल्हाध्यक्ष भिमराव बागुल, श्रीरामपूर लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम झंवर, अन्नछत्रचे संचालक सतिष कुंकलोळ, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार कुऱ्हे, दुर्वांकुरचे देविदास बोंबले, माजी नगरसेवक शशांक रासकर, लायन्स क्लबचे रविंद्र गुलाटी, अस्थिरोगतज्ञ डॉ.प्रशांत कदम, दत्तनगर ग्रामपंचायत सरपंच सुनील शिरसाठ, खोकर ग्रामपंचायत सदस्य राजु चक्रनारायण, अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिबिरात सर्वच आजार व व्याधींवर डॉ.सतिष भट्टड, डॉ.स्वप्नील नवले, डॉ महेश क्षिरसागर, श्री व सौ विजय कबाडी, सौ.प्रज्ञा गाडेकर, श्री.व सौ.अमित मकवाना, डॉ महेन्द्र बोरुडे, श्री.व सौ.विराज कदम, सौ.स्नेहा बैरागी, डॉ अनंत सोनवणे, डॉ.निशांत इंगळे, डॉ दिप्ती गुप्ता, आशादिप केंद्र राहुरीचे डॉ अनिल दुबे, दिव्यांग व्यक्ती व पालकांकरिता मोफत आरोग्य तपासणी व उपचार करून सात दिवसांचे गोळ्या व औषधोपचार दिले जाणार आहे.
आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, महिला प्रदेशाध्यक्ष सौ. स्नेहा कुलकर्णी, राज्य उपाध्यक्ष सुनील कानडे, राज्य समन्वयक विनोद कांबळे, खजिनदार सौ साधना चुडिवाल, अँड प्रमोद सगळगिळे, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, शाखाध्यक्ष सौ. विमल जाधव, विकास साळवे, हाकिम सय्यद, मनिष शिंदे, राजेंद्र राहिंज, मुकिंद गाडेकर, मोमीन शेख, महेन्द्र दिवे आदींसह कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.