छत्रपती संभाजीनगर

पैठण तालुक्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची पदभरती

विलास लाटे/पैठण : कोरोना महामारीच्या परिस्थितीचा धोका लक्षात घेता राज्य  शासनाकडून माहे मे २०२० पासुन सर्व प्रकारच्या पद भरतीवर बंदी घालण्यात आली होती. परंतु आता पन्नास टक्के पदे भरण्यास परवानगी दिलेली आहे.

त्यानुसार पैठण एकात्मिक बालविकास प्रकल्प १ (एक) मध्ये अंगणवाडी सेविका सात (७) मिनी सेविका अठरा (१८) तसेच मदतनिस नऊ (९) त्याचप्रमाणे प्रकल्प २ (दोन) अंतर्गत मिनीअंगणवाडी सेविका सात (७) मदतनिस एक (१) अशा प्रकारे पैठण तालुक्यातील विविध गावामधील रीक्त तसेच नव्याने पदभार भरणार असल्याचे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प १ व २ पैठण. जि.औरंगाबाद यांनी कळविले आहे.

यासाठी शैक्षणिक पात्रता अंगणवाडी सेविका व मीनी अंगणवाडी सेविका यांच्या करिता किमान १० वी पास, मदतनीस किमान ७ वी पास गुणवत्ता प्रमाणे निवड होईल. परिक्षा किंवा तोंडी मुलाखत नाही. वयाची २१ वर्षे वय पुर्ण असणे आवश्यक तसेच ३२ पेक्षा जास्त नसावे. 

अनुसुचित जाती, जमाती १० गुण अधिक तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना ०५ गुण व विधवा १० गुण अधिक राहतील.  जातनिहाय कोणतेही आरक्षण नाही. केवळ या पात्रतेवर पारदर्शक भरती होणार. पात्र उमेदवारांनी दि.०७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पैठण बालविकास प्रकल्प अधिकारी सुनिल अंकूशे आणि शिवाजी वणे यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button