अहिल्यानगर
संत शिरोमणी सावता महाराजांचे सोळावे वंशज वसेकर महाराज यांची वांबोरीला सदिच्छा भेट
राहुरी/मधुकर म्हसे : संत शिरोमणी सावता महाराज यांचे सोळावे वंशज रमेश महाराज वसेकर यांची वांबोरी येथील सावता मंदिरास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचा वांबोरी गावचे सरपंच किरण ससाणे व संत सावता माळी युवक संघा तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या देशावर आलेले कोरोणा संकट हटावे अशी सावता महाराज चरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे यांनी रमेश वसेकर महाराज यांना संघटनेच्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली.
यावेळी प्रदेश मीडिया प्रमुख दीपक साखरे, सचिव भरत सत्रे, वांबोरी शहराध्यक्ष सुनिल शिंदे, उपाध्यक्ष बाळासाहेब सत्रे, बाळासाहेब साखरे, संजय नागदे, सचिन सत्रे, भारत सत्रे, भाऊसाहेब कुऱ्हे, मोहन शिंदे, सोमनाथ कुऱ्हे, निलेश येलजाळे, पप्पू विधाटे, संतोष शिंदे, यश साखरे, तसेच सावतामाळी संघाच्या महिला आघाडीच्या जयश्रीताई व्यवहारे तसेच मोठ्या प्रमाणात महिला व समाजबांधव उपस्थित होते.
वसेकर महाराजांनी संत सावता माळी युवक संघटनेच्या माध्यमातून चाललेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले व शुभ आशीर्वाद दिले.