कृषी

खैरी निमगांव येथे जागतिक मृदा आरोग्य दिन उत्साहात साजरा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ५ डिसेंबर हा जागतीक मृदा आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त खैरी निमगांव येथील वाघाई माता मंदीर येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून मा. तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे उपस्थित होते. त्यांनी माती नमुना काढणे, त्याचे शास्त्रीय पद्धतीने फायदे याविषयी मार्गदर्शन केले. मंडल कृषी अधिकारी मनिष पंडूरे यांनी जमीनीच्या आरोग्यासाठी सेंद्रीय खंताची निवड व वापर याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी सहाय्यक अनिल शेजुळ यांनी केले.

यावेळी नवीनच रुजू झालेले तालुका कृषी अधिकारी म्हणून उल्हास राक्षे यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष अरुण काळे पाटील यांनी केला. याप्रसंगी निमगांव खैरी गावाचे सरपंच दत्तात्रय झुराळे यांनी उपस्थितांना संबोधीत केले.

यावेळी साहेबराव नजन, खंडेराव पटारे, साहेबराव पटारे, विकास पटारे, गोविंदराव वाघ, किशोर काळे, ज्ञानेश्वर भगुरे, कालंगडे, राजू काळे, रामभाऊ काळे, शिवाजी तरस व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अरुण काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक नवनाथ डोकडे प्रयत्नशिल होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button