कृषी

मांडवे खुर्द येथील प्रगतिशील शेतकरी बाजीराव गागरे दिल्ली येथे कृषी पुरस्काराने सन्मानित

पारनेर : तालुक्यातील मांडवे खुर्द येथील प्रगतशील शेतकरी बाजीराव गागरे यांना दिल्ली येथे आयसीएआर व कृषी जागरण यांच्या वतीने देशपातळीवरील ‘मिलेनियर फार्मर्स’ या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग ते करत असतात. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन व नफा मिळवणे हा त्यांचा उद्देश असतो. आपल्या स्वतःच्या शेती बरोबरच आपल्या परिसरातील व ओळखीच्या शेतकऱ्यांना वेळोवेळी मोफत मार्गदर्शनही करत असतात. 5 हजारांपेक्षा जास्त शेतकरी सभासद असणाऱ्या ‘ही मैत्री विचारांची’ या समूहाचे ते एडमिन आहेत. या ग्रुप मध्ये संपूर्ण भारतातील शेतकरी आहेत.

ते आपल्या शेतामध्ये जैविक निवेष्ठांचा वापर करून शेती फायदेशीर करत असतात. त्यासाठी त्यांना बायोमी टेक्नॉलॉजी चे डॉ. प्रफुल्ल गाडगे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. माती जिवंत शेती जिवंत शेती जिवंत तर शेतकरी श्रीमंत हा मूलमंत्र अंगीकारून शेती करत आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button