अहिल्यानगर
वरवंडी येथे मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा
: राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : तालुक्यातील वरवंडी गावात डि जे व सनई च्या वाद्यात मिरवणुकीत बैल गावात हनुमान मंदीराला वेडा मारून फिरवत दर्शन घेतले जाते.
केवळ पुण्याची जमीनच नांगरली नाही, तर आमची डोकी नांगरून अंधश्रद्धेला मूठमाती देऊन महासम्राट बळीराजा, जगद्गुरु तुकोबाराय, स्वराज्य संकल्पक महाबली, फर्जंद शहाजीराजे भोसले महाराज आणि स्वराज्यप्रेरिका, स्वराज्य संकल्पिका जिजाऊ माँसाहेब, यांच्या प्रेरणेने छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थाने बळीराजाचे स्वराज्य निर्माण केले.
बळीराजाच्या आनंदाचा कृषी संस्कृतितील बैलांच्या योगदानाचे ऋण व्यक्त करणारा सण म्हणजेच बैल पोळा. बैलांच्या खुराने शेती केली की, घरात खोऱ्याने समृद्धी येते, असं मानणारा शेतकरी बांधव आणि सगळ्यांनी साथ सोडली, तरी वाळलेला कडबा गोड मानून मालकाच्या सोबत स्वतःही शेतात राबणारे बैल, यांच्यातील नात्याला खरंच तोड नाही.
कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही, हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा व बळीवंशीयांचा आवडता सण म्हणजे पोळा. वर्षभर खांद्याला खांदा लावून आपल्या मालकासोबत शेतीत घामाच्या धारा वाहून सोनं पिकवणाऱ्या सर्जा-राजाचा आजचा दिवस पोळा हा सण आहे.
भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक एकजुटीने राहतात. विविध सण, उत्सव अगदी आनंदाने साजरे केले जातात. माणसाच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जवळपास 70% लोक शेती करतात. ज्यांच्यावर संपूर्ण जग अवलंबून असते. अशा शेतकर्यांचा सण पोळा आहे. तमाम सर्व शेतकरी बंधूंना खुप खुप शुभेच्छा. “इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे” आजच्या पोळा या सणानिमित्त सर्व शेतकरी बंधूंना खुप खुप शुभेच्छा.