अहिल्यानगर
वांबोरी येथे पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे यांचा सन्मान
राहुरी | बाळकृष्ण भोसले – अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ, माळीवाडा मित्र मंडळ वांबोरी व पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने वांबोरीचे भूषण महादेव राधुजी शिंदे यांची राहुरी येथे पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, राज्य सोशल मीडिया प्रमुख दिपक साखरे, वांबोरी शहराध्यक्ष सुनिल शिंदे, बाबासाहेब शिंदे, सोमनाथ कुऱ्हे, दिपक पुंड, सुनील व्यवहारे, संतोष शिंदे, निलेश येलजाळे, भारत सत्रे, शिवाजी पुंड, रामकिसन कुऱ्हे, चैतन्य व्यवहारे, यश साखरे, ओम शिंदे व मोठ्या प्रमाणात महिलांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी श्री संत सावता माळी युवक संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात, त्या बद्दल संघटनेचे कौतुक करत आगामी काळात संघटनेने प्रत्येक गावात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवत गोरगरीब जनतेच्या हितासाठी काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.